
भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका. थेट केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांचे पती होणार दीपकेंच्या आंदोलनात सामील
भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर हे अभिजीत दीपके यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहेत.एसआयआर विरोधातील आंदोलनात निर्मला सीतारमण यांचे पती दीपकेंना साथ देणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर हे दीपके आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत.
पीपल अगेन्स्ट एसआयआर या संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती आणि प्रसिद्ध व्यक्तीही सामील होणार आहेत. या कार्यक्रमातून एसआयआर रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे.




