
ज्ञानेश कुमारांनी सुरू केलं बदल्यांचं ‘अभूतपूर्व’ सत्र… अनेक अधिकाऱ्यांनी कार्यकाळही केला नाही पूर्ण
मतदार यादी SIR वरून संपूर्ण देशात वादंग माजलं आहे. त्या दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्या प्रशासकीय रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यास सुरूवात केली आहे. वर्ष २०२५ आणि २०२६ मध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात जवळपास १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पद ग्रहण केलं होतं. त्यानंतर २० महिन्यात अधिकाऱ्यांच्या बदलांची एवढी मोठी मोहीम पहिल्यांदाच राबवली जात आहे.
अधिकाऱ्यांमध्ये मोठा बदल
द इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष करून उप निवडणूक आयुक्तांच्या (DEC) स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली होत असते. मात्र २०२५ – २६ या दरम्यान अपेक्षेपक्षा जास्त प्रमाणात या बदल्या झाल्या आहेत.




