
राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा
राज्यातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तब्बल २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास (नामांतर) मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमधील २५ तांत्रिक विद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. आता ही शाळा महान व्यक्ती, वैज्ञानिक, साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.
मुंबई शहर:
जुने नाव: एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धोबीतलाव, मुंबई
नवीन नाव: डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई
मुंबई शहर:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, दादर, मुंबई
नवीन नाव: विश्वनाथ बेडेकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई
मुंबई शहर:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई
नवीन नाव: मोहनलाल चौहान शासकीय तांत्रिक विद्यालय, विलेपार्ले पश्चिम, मुंबई
ठाणे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, ठाणे
नवीन नाव: माधवराव भिडे शासकीय तांत्रिक विद्यालय, ठाणे
ठाणे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, बदलापूर
नवीन नाव: माधवराव ओक शासकीय तांत्रिक विद्यालय, बदलापूर
ठाणे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, मुरबाड
नवीन नाव: कृष्णा माळी शासकीय तांत्रिक विद्यालय, मुरबाड
ठाणे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, उल्हासनगर
नवीन नाव: धरमपाल गुप्ता शासकीय तांत्रिक विद्यालय, उल्हासनगर
पालघर:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, तलासरी
नवीन नाव: महादेव अंधेर गुरुजी शासकीय तांत्रिक विद्यालय, तलासरी
पालघर:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, जव्हार
नवीन नाव: नवसु दादा वळवी शासकीय तांत्रिक विद्यालय, जव्हार
रत्नागिरी:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, रत्नागिरी
नवीन नाव: डॉ. धनंजय कीर शासकीय तांत्रिक विद्यालय, रत्नागिरी
रत्नागिरी:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, राजापूर
नवीन नाव: वासुदेव जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, राजापूर
रायगड:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, महाड
नवीन नाव: सुरबानाना टिपणीस शासकीय तांत्रिक विद्यालय, महाड
रायगड:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, पेण
नवीन नाव: जनरल अरुणकुमार वैद्य शासकीय तांत्रिक विद्यालय, पेण
रायगड:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, रोहा
नवीन नाव: पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय तांत्रिक विद्यालय, रोहा
सिंधुदुर्ग:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, शिरगावं
नवीन नाव: आप्पासाहेब गोगटे शासकीय तांत्रिक विद्यालय, शिरगावं
नाशिक:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, नाशिक
नवीन नाव: डॉ. बाळकृष्ण मुंजे शासकीय तांत्रिक विद्यालय, नाशिक
अहिल्यानगर:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, अहिल्यानगर
नवीन नाव: अण्णासाहेब कदम शासकीय तांत्रिक विद्यालय, अहिल्यानगर
धुळे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे
नवीन नाव: वैद्य प्र. ता. जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे
धुळे:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, साक्री
नवीन नाव: नानासाहेब पाटील शासकीय तांत्रिक विद्यालय, साक्री
नंदुरबार:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार
नवीन नाव: बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार
जळगाव:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, जळगाव
नवीन नाव: डॉ. अविनाश आचार्य शासकीय तांत्रिक विद्यालय, जळगाव
जळगाव:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ
नवीन नाव: डी. के. चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ
जळगाव:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, वरणगांव
नवीन नाव: कविवर्य केशवसुत शासकीय तांत्रिक विद्यालय, वरणगांव
जळगाव:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर
नवीन नाव: भवरलाल जैन शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर
जळगाव:
जुने नाव: शासकीय तांत्रिक विद्यालय, मुक्ताईनगर
नवीन नाव: दगडू राठोड शासकीय तांत्रिक विद्यालय, मुक्ताईनगर




