
राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर; शिक्षण विभागाचे अधिकृत परिपत्रक जारी,
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या वेळापत्रकानुसार, मान्यताप्राप्त शाळांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी असणार आहे. त्यानंतर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल झाल्याने पालकांनी आपल्या शाळेकडून खात्री करून घेणं आवश्यक आहे.
२ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुट्टी
उपलब्ध वेळापत्रकानुसार, दिवाळीची सुट्टी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन शनिवार, १४ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना सलग १३ दिवस सुट्टी मिळणार आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक काय?
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी उपलब्ध वेळापत्रकानुसार, पहिलं सत्र सोमवार, १५ जून २०२६ रोजी सुरू झालं असून शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरं सत्र सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होईल. हे सत्र शनिवार, १ मे २०२७ पर्यंत चालणार असल्याचं वेळापत्रकात नमूद आहे.




