गुहागर समुद्रात बुडणार्‍या दोघा तरूणांना जीव रक्षकांनी वाचविले


गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणार्‍या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश ताडेल व निहाल तोडणकर यांनी बाचवल्याची घटना शनिवारी घडली. तांडेल व निहाल तोडणकर यांना अन्य तरुणांनी सहकार्य केले.
शनिवारी चिपळूण येथील गफार भट व झारखंड येथील हिरालाल करमळी हे दोघे आपल्या अन्य सहा मित्रांसोबत गुहागर फिरायला आले होते. गुहागर पोलीस स्थानकाच्या मागील समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. गफार व हिरालाल या दोघांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोन पुरुष खोल पाण्यात बुडू लागले.
आपले मित्र बुडत आहेत, हे कळताच त्याच्या सहकार्‍यानी आरडाओरोड केली. याचवेळी किनार्‍यावरील नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी क्षणाचाही विलंब न घालवता रेस्क्यू बोर्ड घेऊन समुद्रात गेले. या दोघांनीही काही क्षणात बुढणार्‍या दोघांना किनार्‍यावर आणले. बुढणार्‍यांनी प्रदेश व निहालचे बाहेर आल्यावर आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button