रत्नागिरीतील नुतनीकृत अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित​पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन


रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह आजपासून स्थानिक रत्नागिरीकर कलाकारांसाठी समर्पित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
​शनिवार रात्री कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्र येथे या नूतनीकृत सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
​मंत्रोच्चारात उद्घाटन: जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्युट आणि वेद्पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
​सांस्कृतिक मेजवानी: गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ‘बी. ए. परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
​ राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या मीनार गजानन पाटील याचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
​”रत्नागिरीत कलाकारांसाठी एका अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले आहे. या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.”
— डॉ. उदय सामंत (पालकमंत्री)
​या सोहळ्याला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मराठे यांनी केले, तर पालकमंत्र्यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरुप गौरवपत्र त्यांना यावेळी प्रदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button