श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

पाली, ता. जि. रत्नागिरी : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिं. प्र.), पाली येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ (आषाढ शु. १५, शके १९४८) रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवानिमित्त सकाळी ७.०० वाजता षोडशोपचार पूजा होऊन भूपाळी आरती, श्री स्वामी गुरुपद मूर्ती पूजन, गुरुपदग्रहण, नित्य स्वाहाहाकार, नैवेद्य आरती, श्री स्वामी चरित्र पठण तसेच श्री कालभैरवाष्टक पठण व हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचे वाटप होणार असून, त्यानंतर भजन, सांस्कृतिक उपक्रम व मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी नैवेद्य आरती, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार आणि रात्री समारोपाने उत्सवाची सांगता होईल.

या पवित्र सोहळ्यास सर्व स्वामीभक्तांनी व भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिं. प्र.), पाली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button