घरटे संरक्षण उपकरणाला ‘राष्ट्रीय डिझाईन पेटंट’

डॉ. नंदा जगताप यांचे संशोधन; दुर्मीळ पक्षी, वन्यजीव संवर्धनाला बळ

दापोली, ता. २१:- दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. नंदा जगताप यांनी विकसित केलेल्या ‘सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन’ या अभिनव उपकरणाला भारत सरकारकडून राष्ट्रीय डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे.
सौरऊर्जेवर चालणारे हे उपकरण दुर्गम जंगलभागात दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, अंडी आणि कन्यजीवांवर सतत नजर ठेवण्यास तसेच त्यांचे हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याने वन्य जीव संवर्धन क्षेत्रात हे संशोधन महत्वपूर्ण मानले जात आहे.
भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उपकरणाची अधिकृत नोंदणी करून त्याचा समावेश शासकीय डिझाईन जर्नलमध्ये केला आहे. वन्यजीव आणि पक्षी संरक्षणासाठी विकसित करण्यात आलेले हे उपकरण दुर्मिळ पक्ष्यांची घरटी अंडी आणि वन्यजीवांवर सतत पाळत ठेवण्यास मदत करते. या संशोधनात डॉ. जगताप यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठाचे डॉ. अमिताभ शाद, छत्तीसगडचे संशोधक निशांत घोडे आणि मेरठ येथील डॉ. संगीता शर्मा यांचा सहभाग होता. संशोधनासाठी मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल डॉ. जगताप यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे तसेच दापोली एज्युकेशन सोसायटीचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button