ब्राऊन हेरॉईनची तस्करी प्रकरणी २ अटकेत


रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी दोघा संशयिताना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकुण २४२ अमली पदार्थाच्या पुड्या जप्त केल्या असून त्यांची किमंत १ लाख ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शिवकुमार चौधरी ऊर्फ शिवबहादूर सोनार (३२, रा. पांढरा समुद्र, मुसळेवाडी, रत्नागिरी), दुर्गा जीत बहादूर (३१, सध्या रा. पांढरा समुद्र, मुसळेवाडी, रत्नागिरी; मूळ नेपाळ) अशी संशयितांची नावे आहेत.
रत्नागिरी शहरातील अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून आठवडा बाजार परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होते. यावेळी आठवडा बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ संशयित शिवकुमार सोनार व दुर्गा जीत बहादूर दोघे संशयास्पद हालचाल करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. दोघा संशयितांकडून १ लाख २१ हजार रुपये किमतीच्या २४२ पुड्या जप्त केल्या. याशिवाय भगव्या रंगाची रिकामी प्लास्टिक पिशवी, पुड्या बांधण्यासाठी वापरलेले कागदाचे तुकडे आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button