
कातकरी बांधवांसोबत विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी; १५ वर्षांची सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम
चिपळूण : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी आदिवासी कातकरी वाड्यांमध्ये जाऊन फराळाचे वाटप करतात आणि कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही चिपळूण तालुक्यातील गाणे आणि कळकवणे येथील कातकरीवाड्यांत फराळासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे आणि मार्गदर्शक दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दशरथ दाभोळकर यांनी गेल्या १५ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. केवळ दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यापुरते मंडळाचे कार्य मर्यादित नसून, वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष शशांक भिंगारे यांनी कातकरी पाड्यांवरील दिवाळी फराळ वाटपाच्या उपक्रमासह मंडळाच्या वर्षभरातील सामाजिक आणि विधायक कार्याची माहिती दिली. फराळ आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपातून आदिवासी बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
या उपक्रमात दशरथ दाभोळकर, विकास ढवण, शशांक भिंगारे, राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, दत्तात्रय कदम, संदीप सुर्वे, राकेश प्रजापती, अजित वाडकर, अभिजीत यादव, विकास पवार, युवराज कवडे, वैभव महाडिक, शरद पवार, अर्चिता दाभोळकर, जयेश वाडकर, जयंत वाडकर, साईराज वाडकर, अमेध दाभोळकर, हर्ष वाडकर, सुमित पवार, सुजल वाडकर, समर्थ वाजे, संस्कार वाजे, अर्थव पवार आणि दिनेश माटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.




