वरिष्ठ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार


नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षांमधील गैरप्रकार आणि देशभरातील वाढत्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि संकटमोचक नेत्याकडे शिक्षण मंत्रालयाचा पदभार सोपवला आहे.
वरिष्ठ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक काळात त्यांनी शास्त्री भवनाची (शिक्षण मंत्रालय) कमान हाती घेतली आहे.

सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या दोन महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची सूत्रे सोपवून मोदी सरकारने एका अनुभवी आणि खंबीर नेत्याच्या हाती या मंत्रालयाची कमान सोपवल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button