‘२०२९ पूर्वी २१ राज्‍यांमध्‍ये समान नागरी कायदा लागू होणार’; अमित शाह यांची मुंबईतून मोठी घोषणा!

Uniform Civil Code : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार असलेल्या २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी आज दिली आहे.

“आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरी संहिता (UCC) आणली आहे. मला खात्री आहे की, २०२९ पूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये आम्ही UCC लागू करू,” असं अमित शाह यांनी मुंबईत बोलताना म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button