स्पेन ठरली वर्ल्ड चॅम्पियन! गतविजेत्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का देत दुसऱ्यांदा पटकवला फिफा वर्ल्ड कप


फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात फायनल सामना पार पडला. 20 जुलै रोजी झालेल्या या फायनल सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिना संघाला स्पेनने 1-0 ने मात दिली आणि यासह दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल केला. 2010 नंतरचा स्पेनचा हा दुसरा वर्ल्ड कप ठरला, तर यामुळे अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी हुकली.

106 व्या मिनिटाला आला निर्णायक गोल :

फुटबॉल फायनलचा खेळ हा 90 मिनिटांचा असतो मात्र 90 मिनिटांच्या खेळात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर अतिरिक्त वेळेतील 106 व्या मिनिटाला पेड्रो पोरोने मारलेला ‘क्रॉस’ निको विल्यम्सने हेडरद्वारे टोरेसच्या दिशेने पाठवला. ‘बॉक्स’मध्ये सज्ज असलेल्या फेरान टोरेसने क्षणही वाया न घालवता आपला पहिलाच शॉट गोलच्या दिशेने लगावला. अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझ याला यावर काहीच उपाय करता आला नाही आणि हाच फटका सामन्यातील निर्णायक गोल ठरला.फायनलमध्ये स्पेनने सुरुवातीपासूनच बॉलवर नियंत्रण ठेवले आणि लागोपाठ अर्जेंटिनाच्या गोलवर अटॅक केला. पाचव्या मिनिटाला लामिनयामालने प्रथमच सर्वात मोठी संधी तयार केली, परंतु एमिलियानो मार्टिनेजने उत्कृष्ट बचाव केला. त्यानंतर मिकेल ओयरजाबाल, मार्क कुकुरेला, पाउ कुबारसी, पेड्री आणि निको विलियम्स ने अनेक चांगले प्रयत्न केले, परंतु मार्टिनेज सतत स्पेनच्या रस्त्यात अडथळा बनला. अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेजने सर्व सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं आणि एकूण 12 सेव्ह केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button