
अखेर अमेरिका-इराण युद्ध थांबले?, 107 दिवसांचा संघर्ष संपला; होर्मुझबाबतही मोठा निर्णय
१०७ दिवसांपासून संपूर्ण पश्चिम आशियाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही देशांनी ६० दिवसांच्या युद्धविराम फ्रेमवर्कवर सहमती दर्शवली आहे.
प्रस्तावाप्रमाणे सर्व काही ठीक झाल्यास येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये या ऐतिहासिक करारावर औपचारिक स्वाक्षरी केली जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत या कराराची घोषणा केली.
कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची घसरण
या कराराचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणार आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी, जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजीची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असे. आता हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी सर्वात आधी या फ्रेमवर्क कराराची माहिती दिली. दोन्ही बाजूंनी युद्ध आणि लष्करी कारवाया थांबवण्यास संमती दिली असून, आता आण्विक मुद्द्यांवर चर्चा पुढे जाईल, असं त्यांनी सांगितलं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. जगातील जहाजांनो, आपले इंजिन चालू करा. मी होर्मुझची सामुद्रधुनी टोल-फ्री उघडण्यास आणि अमेरिकन नौदलाची नाकेबंदी हटवण्यास मान्यता देत आहे.”
मात्र इराणने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही




