एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वेने तब्बल १.८२ लाख फुकट्या प्रवाशांवर केली कारवाई

कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत रेल्वे प्रशासनाने एकूण ५,४९३ विशेष मोहिमा राबवल्या. या तपास मोहिमांदरम्यान तब्बल १.८२ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आलेया सर्वांवर दंडात्मक कारवाई करत कोकण रेल्वेने १२.८१ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे.

केवळ ऑक्टोबर २०२५ महिन्यातच कोकण रेल्वेने ९२० तपास मोहिमा राबवल्या, ज्यामध्ये ४२,६४५ प्रवासी विनातिकीट आढळले. या प्रवाशांकडून तब्बल २.४० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button