RSS वर बंदी घालावी’; मोहन भागवतांच्या न्यूयॉर्क दौऱ्यापूर्वी अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची मागणी!

US Commission on International Religious Freedom : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) अमेरिकेत बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम (USCIRF) च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या सरकारकडे ही मोठी मागणी केली आहे.

अमेरिकेच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही नेत्यांना राजनैतिक शिष्टाचार देऊ नये, किंवा त्यांच्याबरोबर कोणत्याही उच्चस्तरीय बैठका घेऊ नये, असं आवाहन अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिका दौरा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मोहन भागवत हे २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र, त्यांच्या या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने थेट आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button