पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत,.17 सप्टेंबरनंतर देशात काय होणार? संजय राऊत यांची सकाळी नऊची भविष्यवाणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. या राहुल गांधी यांच्या मताशी मी सहमत आहे. उलट मी हे आधीपासूनच बोलत आलो आहोत. थोडं थांबा. 17 सप्टेंबर नंतर मोठा उलगडा होणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी राहणार नसल्याचं आणि अमित शाह हे पंतप्रधान होणार नसल्याचं भाकीतही केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

येत्या एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागेल, असं राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटल्याचं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी गेले काही दिवस काय सांगतो? मी गेले काही महिने हेच सांगत आहे. पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावं लागेल. तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर उलगडा होईल, असं संजय राऊत म्हणाले.
17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अंधभक्तांनी उड्या माराव्यात, पार्ट्या कराव्यात, असं सांगतानाच अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत. मोदी पायउतार झाल्यावर आहे काय? एकावर एक फ्रि आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात. आमच्यासमोर जे काही तथ्य येतात, त्यानुसार मी सांगत आहे. लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल. हे मी सर्व जागतिक स्तरावर जे चित्र आहे, त्यानुषंगाने बोलत आहे, असं राऊत यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button