हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले,


भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर मायदेशात परतलेल्या संघात बरीच खलबत झालेली पाहायला मिळाली.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) हरमनप्रीत कौर, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार व उप कर्णधार स्मृती मानधना यांच्यासोबत संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यात हरमनप्रीतच्या कर्णधारपदाला धोका नसल्याचे म्हटले गेले, परंतु कर्णधारने तिच्या इंस्टाग्रामवरून एकच खळबळ उडवून दिले. तिने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ चा वन डे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. हरमनप्रीतने लिहिले की,”आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यामध्ये वर्षांनुवर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण सामावले आहेत, जे माझ्या उर्वरित आयुष्यात कायम माझ्यासोबत राहतील.”मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व पणाला लावले. माझे रक्ताचे पाणी केले, घाम गाळला, वेळ दिला आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा बळीही दिला. असे अनेक क्षण आले जेव्हा मला माझे वैयक्तिक प्रदर्शन, माझी स्वतःची प्रगती आणि मला माझ्यासाठी काय हवे आहे हे बाजूला ठेवावे लागले, कारण ‘संघ नेहमी प्रथम आला पाहिजे’ यावर माझा ठाम विश्वास होता,”असे ती पुढे लिहिते.ती पुढे म्हणाली,” एक कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. असे निर्णय जे नेहमीच सर्वांना समजले असे नाही, जे अजिबात सोपे नव्हते आणि ज्यांची कधीकधी मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली. पण मी घेतलेला प्रत्येक निर्णय ‘संघ’ अधिक मजबूत करणे आणि इतर खेळाडूंना पुढे जाण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःतील सर्वोत्तम खेळाडू घडवण्याची संधी देणे,या एकाच उद्देशाने घेतला होता. मी सर्व काही अनुभवले आहे.”

“आज मी मनामध्ये अनेक भावना घेऊन, पण शांत आणि समाधानी अंतःकरणाने कर्णधारपद सोडत आहे.माझा संघ आज एका उत्तम स्थितीत आहे, यावर मनापासून विश्वास आहे.मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे, असे मला वाटते. माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी या संघाला दिले. कर्णधारपद आज संपत असले, तरी भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही संपणार नाही. आता, मी पुन्हा एकदा फक्त खेळावरील प्रेमासाठी मैदान गाजवायला तयार आहे. कर्णधारपद संपले आहे. पण हा प्रवास असाच सुरू राहील,” असे तिने शेवटी लिहिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button