लाखो गणेशभक्त आणि चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी, दोन उड्डाणपूल होणार सुरू


कोकणच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्‍या लाखो गणेशभक्त आणि चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील महत्त्वाचे निवळी पूल आणि लांजा उड्डाणपूल येत्या आठवडाभरात वाहतुकीसाठी खुले करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे दोन्ही पूल सुरु झाल्यास गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची शक्यता आहे.
निवळी पूल सुमारे १२ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आला असून, त्याची लांबी ८० मीटर आहे. पुलाला ६२० मीटरचे जोडरस्ते असून, एकूण लांबी सुमारे ७०० मीटर आहे. पुलाखाली चार गाळे उभारण्यात आले आहेत. हा पूल सुरू झाल्यानंतर
निवळी परिसरातील धोकादायक नागमोडी वळणे आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. लांजा उड्डाणपूल सुमारे ७० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आला असून त्याची लांबी ९७५ मीटर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button