सीमा शुल्क मंडळ, रत्नागिरी यांच्यातर्फे दक्षता जागरूकता सप्ताह-२०२६ अंतर्गत पदयात्रेचे आयोजन

रत्नागिरी– सीमा शुल्क मंडळ, रत्नागिरी यांच्यातर्फे दक्षता जागरूकता सप्ताह-२०२६ च्या निमित्ताने मंगळवारी ‘समृद्धीसाठी प्रामाणिकता’ या संकल्पनेअंतर्गत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
सार्वजनिक जीवनात प्रामाणिकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक आचरण यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
पदयात्रेचा प्रारंभ सकाळी रत्नागिरी येथील मारुती मंदिरापासून करण्यात आला. यावेळी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ही पदयात्रा माळनाका आणि जयस्तंभ मार्गे मार्गक्रमण करत सीमा शुल्क मंडळ, रत्नागिरी येथील कार्यालयाच्या आवारात समाप्त झाली.
शासकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि पारदर्शकता यांचे महत्त्व अधिकारीवर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आणून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. तसेच, सुशासनाला चालना देणे, जनतेचा विश्वास दृढ करणे आणि प्रशासकीय कामकाजात उत्तरदायित्व सुनिश्चित करणे यासाठी प्रामाणिकतेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून सीमा शुल्क मंडळ, रत्नागिरी यांनी दक्षता जागरूकता सप्ताह-२०२६ च्या भावनेशी सुसंगत राहून शासकीय सेवेमध्ये प्रामाणिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचे सर्वोच्च मानदंड कायम राखण्याबरोबरच नैतिक मूल्यांवर आधारित आणि उत्तरदायी प्रशासनाप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

के टीव्ही न्यूज रत्नागिरी
28/10/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button