रत्नागिरीतून विजय पांचाळ बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन


रत्नागिरी, दि. २८ ): शहरातील नाचणे, सहकार नगर येथील रहिवासी विजय सोनू पांचाळ (वय ४३) हे बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय पांचाळ हे दुर्वांकुर अपार्टमेंटसमोरील परिसरातून श्री. माने यांच्याकडून ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता निघून गेले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:

  • उंची: सुमारे ५ फूट
  • रंग व बांधा: सावळा रंग, सडपातळ बांधा
  • चेहरापट्टी: सरळ नाक आणि काळे केस
  • शिक्षण: पाचवीपर्यंत
  • पोशाख: बेपत्ता होताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ बरमुडा परिधान केली होती.
    सदर वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button