
दापोली तालुक्यातील वाकवली येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील वाकवली येथे विहिरीत पडून मंन्नूराज घोंगाराज बन्सी (रा. जिल्हा औरंगाबाद, बिहार) या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑक्टोबर सकाळी १८.४५ ते २ नोव्हेंबर संध्याकाळी ४ वाजण्याच्या मुदतीत घडली.
बन्सी हा सुमेध मोहन मोहिते यांच्याकडे एमए शेट कंपनी शाखा कुंभवे येथे कामाला होता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४५ ते २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या मुदतीत बाकवली येथे एका घराच्या मागे असणार्या विहिरीमध्ये पडलेला आढळून आला. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




