रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथे तरुणाचा मृतदेह आढळला


रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुहास रघुनाथ मांडवकर (४३, रा. मुरुगवाडा रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. सुहास याला दारु पिण्याचे व्यसन होते. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुहास याचा मृतदेह मिरकरवाडा जेटी येथील समुद्राच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button