आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘परिसर’ कार्यक्रमात ‘पक्षी स्थलांतरण’ विषयावर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा विशेष संवाद


रत्नागिरी, दि. २४ ): आकाशवाणी रत्नागिरीच्यावतीने ‘परिसर’ या कार्यक्रमांतर्गत ‘पक्षी स्थलांतरण’ या महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा विशेष संवाद प्रसारित होणार आहे. विद्या तावडे यांनी त्यांच्याशी हा संवाद साधला आहे.
हा कार्यक्रम २५, २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.५० वाजता प्रसारित केला जाणार असून, त्याचे पुनःप्रसारण त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता होईल. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी रत्नागिरीची असून, सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत. कोकणातील व परिसरातील पक्षीजीवन आणि स्थलांतराच्या या रंजक व अभ्यासपूर्ण विषयावर आधारित हा संवाद श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:

  • कार्यक्रम: परिसर
  • विषय: पक्षी स्थलांतरण
  • संवाद: प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी) व विद्या तावडे
  • प्रसारण तारीख व वेळ: २५, २६ व २७ नोव्हेंबर २०२६, सकाळी ६.५० वाजता
  • पुनःप्रसारण: दुपारी २.१० वाजता
  • प्रसारण व्याप्ती: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर
  • सादरकर्ते: विवेक वानखडे
  • निर्मिती: आकाशवाणी रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button