कोकणातील चाकरमान्यांसाठी खुषखबर, गणेशोत्सवासाठी १३ विशेष गाड्या


गणेशोत्सवासाठी कोकण रेल्व मार्गावर १३ विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई तसेच दिवा येथून मडगाव, सावंतवाडी रत्नागिरी, चिपळूण तसेच खेडसाठी या गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबरपासून या विशेष गाड्या धावणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच सावंतवाडी, एलटीटी- सावंतवाडी, सीएसएमटी-रत्नागिरी-एलटीटी-मडगाव, एलटीटी – रत्नागिरी, एलटीटी सावंतवाडी, मडगाव-एलटीटी, पुणे-रत्नागिरी, दिवा- खेड तसेच दिवा ते चिपळूण या मार्गावर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यापैकी दिवा ते चिपळूण तसेच खेड ते दिवा दरम्यान चालवण्यात येणार्‍या विशेष रेल्वे या मेमू श्रेणीतील असतील. त्यामुळे आगाऊ आरक्षण न केलेल्या आणि आयत्यावेळी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
या गणपती विशेष गाड्यांपैकी चिपळूण तसेच खेडसाठी जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्या या १२ डब्यांच्या मेमू विशेष असतील. या गाड्या अनारक्षित धावणार आहेत. यातील दिवा ते चिपळूण मेमूच्या एकूण १५ फेर्‍या चालवल्या जाणार असून दिवा ते खेड मार्गावरील मेमू स्पेशल गाडीच्या गणेशोत्सवात एकूण १६ फेर्‍या होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button