एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘बेयॉन’चे ‘माई ह्युंदाई’ मध्ये दिमाखदार अनावरण’ माई ह्युंदाई’ने जपला ग्राहकांचा अतूट विश्वास – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे तंत्रज्ञानाच्या वेगावर स्वार होताना सुरक्षिततेचे नियम पाळा – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते


रत्नागिरी, दि. २९ ): ऑटोमोबाईल विश्वात आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार वाहनांसाठी अग्रगण्य असणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या बहुप्रतिक्षित अशा ‘बेयॉन’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या कोऱ्या कारचे येथील नामांकित ‘माई ह्युंदाई’ शोरूममध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात अनावरण करण्यात आले.
या शानदार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. याप्रसंगी माई ह्युंदाईचे कोकण व्यवसाय प्रमुख विनोद म्हात्रे, विक्री प्रमुख समीर सुर्वे, सहाय्यक व्यवस्थापक आनंद लिमये, प्रसिद्ध आंबा व्यावसायिक अशोक लांजेकर तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे सीपीसी प्रमुख राघवेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते.
‘माई ह्युंदाई’ची विश्वासार्हता कौतुकास्पद : राजवर्धन करपे
आपल्या मनोगतात वाहनांच्या आधुनिकतेवर प्रकाश टाकताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे म्हणाले, “ह्युंदाईने नेहमीच जागतिक दर्जाची डिझाईन, उत्कृष्ट शैली आणि प्रगत तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना दिले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात कंपनीने स्वतःचे एक वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या संपूर्ण पट्ट्यात ‘माई ह्युंदाई’ने ग्राहकांना अविरत तत्पर आणि दर्जेदार सेवा देत ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे.”
वेगावर स्वार होताना नियमांची चौकट जपा : प्रशांत सातपुते
वाहन चालवताना सुरक्षिततेला अग्रक्रम देण्याचे आवाहन करत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, “नवीन तंत्रज्ञानाचा आणि वेगाचा स्वीकार करताना शासनाने आखून दिलेल्या वाहतूक नियमांची चौकट घट्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. आज अनेकदा दुचाकीस्वारांकडून किंवा इतर चालकांकडून डाव्या बाजूने वाहन चालवणे किंवा वळण घेण्याच्या साध्या नियमांकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. वेगाचा आनंद घेण्याआधी प्रत्येकाने सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यायला हवे.” असे सांगून त्यांनी ‘माई ह्युंदाई’ने निर्माण केलेल्या विश्वासार्ह ब्रँडचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
तंत्रज्ञानाची पर्वणी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) फिचर्सने सुसज्ज असलेली ‘बेयॉन’ कार पाहण्यासाठी आणि तिच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी स्थानिक उद्योजक, वाहनप्रेमी, ग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी गाडीच्या आकर्षक लुक आणि अत्याधुनिक फिचर्सची मनमुराद प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button