संगमेश्वर ते देवरुखकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणार्‍या तरुणाला घेतले ताब्यात


संगमेश्वर ते देवरुखकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागील बाजूस अंधाराचा फायदा घेऊन संशयितरित्या भटकणार्‍या एका तरुणाला संगमेश्वर पोलिसांनी पकडले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने तो या ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले असून, त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर ते देवरुख रस्त्यावरील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचा त्याचा उद्देश असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संकेत सोपान आटोळे यांनी फिर्याद दिली आहे. मनोजकुमार रामप्रकाश (३२, उत्तर प्रदेश) सध्याचा तो शास्त्रीपूल येथे अब्दुल खान यांच्या भंगार दुकानात राहतो.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मनोजकुमार याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) अंतर्गत गुन्हा नोंद (गु.र.नं. १३३/२०२६) करण्यात आला असून, या गुन्ह्याची नोंद ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९२५ वाजता झाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button