
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून, महामार्गावरील पाली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलावरून वाहनांची ये-जा सुरू झाल्याने या परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महामार्गाचे काम निकडीचे बनले असताना ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने विविध टप्प्यांवरील कामांना वेग दिला आहे. चेपालीनंतर आता लांजा आणि निवळी येथील नी उड्डाणपूल व रस्त्यांची कामे युद्धपातळीवर ल सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी नरे करण्यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ बाढवून कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाल आहे. निवळी येथे सुमारे ८०० मीटर २ लांबीच्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून, लांजा येथे तब्बल २ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासह रस्त्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.




