अपूर्ण महामार्गावरील टोलवसुली थांबवा, खा. सुनील तटकरे यांची मागणी


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, अशा परिस्थितीत सुरू असलेली टोलवसुली तातडीने बंद करण्यात यावी, अशी ठाम मागणी रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच ताम्हिणी घाटातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आधुनिक बोगद्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत खासदार तटकरे यांनी लेखी निवेदन सादर करून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील रखडलेल्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button