मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे वाहनधारकांसाठी ठरत आहे जीवघेणे


गेली तब्बल १७ वर्षापासून सुरू असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्णत्वास न आल्याने वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात महामार्गावर ठिकठिकाणी पडणारे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रवास जीवघेणा बनत आहे.
उन्हाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. पावसाळ्यात खड्डे पडू लागल्यानंतर केवळ खडी तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र सततचा पाऊस आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे उघडे पडतात. परिणामी वारंवार त्याच ठिकाणी रुस्ती करावी लागते, तर काही ठिकाणी दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते. चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परित्तत्सन वाशिष्टी नदी पुलाजवळील जोड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणी वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button