ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी अखेर खुला


पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट गुरुवारपासून अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घाट बंद करण्यात आला होता. या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांसह प्रवासी वाहने चालवण्यास परवानगी देण्यात आली असून अवजड वाहनांना अद्याप प्रवेश दिला जाणार | नसल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पौंड- माणगाव मार्गावर दरडी कोसळून मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करत प्रशासनाने खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. घाट बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्त्यावर कोसळलेली माती, दगड आणि मलभा हटवत नादुरूस्त भागांची कामे वेगाने पूर्ण केली.मुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट गुरुवारपासून अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घाट बंद करण्यात आला होता. या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांसह प्रवासी वाहने चालवण्यास परवानगी देण्यात आली असून अवजड वाहनांना अद्याप प्रवेश दिला जाणार नसल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पौंड- माणगाव मार्गावर दरडी कोसळून मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करत प्रशासनाने खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. घाट बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्त्यावर कोसळलेली माती, दगड आणि मलभा हटवत नादुरूस्त भागांची कामे वेगाने पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button