“कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

💠 “चलचित्र” विभागात संदीप मेस्त्री व “सजावट” विभागात अनिकेत सुपल यांचा देखावा प्रथम

💠 यंदा “चलचित्र- सजावट” असे दोन स्वतंत्र विभाग!*

💠 रत्नागिरी नगर परिषदेचेही विशेष सहकार्य

💠 पालकमंत्री उदयजी सामंत, आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांचे स्पर्धेला पाठबळ

रत्नागिरी : रत्नागिरीतील सर्वात लोकप्रिय “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” यंदाही मोठ्या दिमाखात घेण्यात आली. या स्पर्धेत यंदा प्रथमच “चलचित्र” आणि “आरास-सजावट” असे दोन विभाग करण्यात आले होते. या विभागांतर्गत “चलचित्र” विभागात संदीप चंद्रकांत मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांनी साकरलेल्या “श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रगटावतार” चलचित्र देखाव्याने प्रथम क्रमांक पटकवला, तर “आरास / सजावट” विभागात अनिकेत सूर्यकांत सुपल ( सह्याद्रीनगर – नाचणे ) यांनी साकरलेल्या “बारा ज्योतिर्लिंग” सजावटीने प्रथम क्रमांक पटकवला असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी आज 17 सप्टेंबर रोजी जाहीर केले.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांचे या स्पर्धेला भक्कम पाठबळ लाभले आहे. तसेच यंदा या स्पर्धेला रत्नागिरी नगर परिषदेचेही सहकार्य लाभले आहे. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी या स्पर्धेला नगरपरिषदेचे संपूर्ण सहकार्य दिले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे गणपती स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून या स्पर्धेच्या परीक्षणाला प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील बिकट वाटा, दिवस-रात्र एक करत स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या स्पर्धेचे काटेकोरपणे परीक्षण केले आणि आज त्वरित निकाल जाहीर केला जात आहे. स्पर्धेसाठी स्वतः कांचन मालगुंडकर, अभिजीत नांदगावकर, नरेंद्र पाटील, विजय पाडावे, मुकुंद विलणकर ,विजय बासुतकर, ओंकार पाटणकर, शकील गवाणकर, बाळकृष्ण चव्हाण, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे, चंद्रहास विलणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेची लोकप्रियता प्रतिवर्षी वाढत आहे. दरवर्षी काही नाविन्यापूर्ण पायंडा स्पर्धेत पाडण्यात आला आहे. यंदाही असाच विशेष बदल करण्यात आला असून अधिकाधिक गणेशभक्तांना या स्पर्धेशी जोडण्याच्या हेतूने स्पर्धेत “चलचित्र” आणि “आरास” असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आकर्षक आरास करणाऱ्या गणेशभक्तांनाही या स्पर्धेचे दरवाजे खुले झाले आहेत. तरी अधिकाधिक गणेशभक्तांनी या दोन्ही विभागात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक कांचन मालगुंडकर यांनी केले होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -:
🔸 चलचित्र विभाग : – प्रथम क्रमांक – संदीप मेस्त्री, सड्येवाडी-जयगड
( श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रगटावतार )
द्वितीय क्रमांक – मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर ( हिरकणी देखावा )
तृतीय क्रमांक – दीपक मेस्त्री, मिरजोळे ( भक्त पुंडलिक ).

🔸 आरास / सजावट विभाग :- प्रथम क्रमांक – अनिकेत सुफल, सह्याद्रीनगर – नाचणे ( बारा ज्योतिर्लिंग ), द्वितीय क्रमांक – स्वप्नील ठिक, तिवंडेवाडी-शिरगाव ( ग्रामीण घर -वारली पेंटिंग ), तृतीय क्रमांक – अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी ( दगडावर चित्रकला )

🔸 सुबक मूर्तिकार
वैभव लिंगायत ( राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती)

🔸 विशेष उल्लेखनीय :- चारुदत्त धालवलकर, गावखडी ( संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत )
जीवन कोळवणकर, कुवारबाव (गोकर्ण महाबळेश्वर कथा )
साईराज वाडकर, मिरजोळे ( छ. शिवाजी महाराज -भवानी तलवार )
घाटकर परिवार, शेडगेवाडी -पावस ( अन्नभेसळ समाजप्रबोधन ).

🔸 उत्तेजनार्थ :-
:- 1) साईराज पोटफोडे, जुनी तांबटआळी-रत्नागिरी ( पुरातन मंदिर ),
2) निखिल साळवी, गावखडी ( सुंभ आरास )
3) आग्रे परिवार, पावस ( एकविरा माता मंदिर )
4) संकेत पाटील ( रेडियशन दुष्परिणाम )

🔸 प्रोत्साहनपर :- पारितोषिक :- अथर्व सावंत, नाचणे ( बारा ज्योतिर्लिंग ), विशाल शिंदे -सोमेश्वर ( ग्रामीण वारली पेंटिंग ), किशोर जोशी, मिरजोळे ( सीताहरण )
सागर पुसाळकर, निवखोल ( आकर्षक आरास )
ओंकार कांबळे, भाटिमिऱ्या ( रामसेतू )
चैतन्य खेडेकर, बंदररोड ( आकर्षक आरास )
दीक्षा रसाळ, वरचीआळी ( वारली पेंटिंग )
सुरेश सनगरे, परटवणे ( वारली पेंटिंग )
यश आंब्रे, गावडे आंबेरे ( मंदिर देखावा )
आध्या शिर्सेकर, भाट्ये (निसर्ग देखावा )
ओम तोडणकर, कुर्ली ( आकर्षक आरास )
सार्थक मुरकर, फणसोप ( गोकुळधाम )
महेश सुतार ( गावखडी सुतारवाडी )

सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन! ✨🌿☘️🌹🌿☘️🌹. बक्षीस वितरण कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर होईल.
🙏धन्यवाद🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button