सचिन इंगळी यांची उप संचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेशपदी पदोन्नती


रत्नागिरी, ): महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. सन २०२५-२६ या निवडसूची वर्षात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (गट-अ) संवर्गातून सचिन इंगळी यांना ‘उप संचालक भूमी अभिलेख’ (गट-अ) या वरिष्ठ संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, पदोन्नतीनंतर श्री. इंगळी यांची उप संचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या उप सचिव अश्विनी यमगर यांच्या स्वाक्षरीने हा शासन आदेश ३० ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यास नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू करून घेऊन शासनास त्याबाबत अवगत करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांना देण्यात आले आहेत.
श्री. इंगळी यांच्या या पदोन्नतीबद्दल प्रशासकीय आधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button