
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथे क्षुल्लक कारणातून दाेघा भावांना मारहाण
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथे क्षुल्लक वादातून दाेघा भावांना मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी 12.10 वाजण्याच्या सुमारास घडली. निफज अब्दुल रेहमान डाेना (22), वसी अब्दुल रेहमान डाेना (19, रा. मालवणकर कपाउंड, बाजारपेठ रत्नागिरी) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांचे नावे आहेत. याप्रकरणी पाेलिसांनी समद खत्री (रा. मिरकरवाडा रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निफज व वसी डाेना हे शनिवारी मिरकरवाडा जेटी याठिकाणी काम करत हाेते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संशयित आराेपी हा मिरकरवाडा जेटी येथे तक्रारदार काम करत असलेल्या ठिकाणी आला. यावेळी समद खत्री याने निफज व वसी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच खिशातून चावी काढून वसी याच्या कानावर मारून दुखापत केली अशी तक्रार रत्नागिरी शहर पाेलिसात दाखल करण्यात आली आहे.



