खेडमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान

खेड : राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने खेड शहरातील डॉक्टरांचा भाजपा नेते तथा खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा देणारे, संकटाच्या प्रत्येक क्षणी आपल्या ज्ञान, समर्पण आणि सेवाभावाने रुग्णांना नवजीवन देणारे वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवेचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला. यामध्ये स्माईल स्पेस मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉ. वेद मिलिंद तलाठी, डॉ. विरेंद्र चिखले, डॉ. ज्ञानेश्वर मरकड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी खेड नगरपालिकेच्या नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, परेश चिखले, रिद्धी दळवी, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश, ओवैस चौगुले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button