
रत्नागिरीच्या क्रिकेटपटूंना मिळणार आयपीएलचे व्यासपीठ
आयपीएलमधील प्रसिद्ध संघ राजस्थान राॅयल्स आता रत्नागिरीतील ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना घडविण्यासाठी आणि जिल्ह्यामध्ये स्पाेर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी पुढे आला आहे. यामुळे काेकणातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग माेकळा झाला असून जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासालाही एक नवीन दिशा मिळणार आहे.
या उपक्रमाची पाहाणी करण्यासाठी राजस्थान राॅयल्सच्या हाय पराॅर्मन्स सेंटरच्या टीमने नुकतीच रत्नागिरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला भेट देऊन तेथील सुविधांची बारकाईने पाहाणी केली. या स्टेडियमची पाहणी केल्यानंतर टीमने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीदरम्यान रत्नागिरीतील ग्रामीण भागात लपलेल्या क्रीडा गुणवत्तेला याेग्य संधी देणे, आधुनिक क्रिकेट काेचिंग उपलब्ध करून देणे आणि क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमाचे स्वागत करीत पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासन व प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत पुरविली जाईल, अशी ग्वाही दिली.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राजस्थान राॅयल्सच्या हाय पराॅर्मन्स सेंटरचे डायरेक्टर व टीम मॅनेजर राेमी भिंडर, चीफ ऑपरेटिंग ऑिफसर आलाेक चित्रे, काेच प्रशांत कांबळे तसेच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हाेते. या सहकार्यामुळे रत्नागिरीतील युवा खेळाडूंच्या स्वप्नांना नवी उडण मिळणार असून लवकरच स्थानिक खेळाडू माेठ्या क्रीडांगणावर चमकताना दिसतील.




