कळंबणीतील तरुणाची ट्रकमध्ये आत्महत्या


मुंबई-गाेवा महामार्गावरील कळंबणी हद्दीत उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये किशाेर रमेश कुराडे (28 रा. कळंबणी-हंबीरवाडी, खेड) गळास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
महामार्गाच्या कडेला ट्रक एकाच ठिकाणी बराच वेळ उभा असल्याने स्थानिकांचे लक्ष तेथे गेले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ट्रकमधील केबिनमध्ये एका व्यक्तीने गळास घेतल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी याची येथील पाेलिसांना या घटनेची माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक विवेक अहिरे व पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
या तरुणाने हे टाेकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समाेर आलेले नाही. या प्रप्रकरणी येथील पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button