फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट 20-22 हजार रुपये मिळणार? – नितेश राणे


राज्य सरकारच्या धडाकेबाज निर्णयाची मालिका सुरूच आहे. आज राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे नवीन घोषणा केली आहे. नितेश राणे यांची ही घोषणा मच्छिमारांसाठी आहे.मच्छिमारांना संकटात मदत करण्याची ही घोषणा आहे. संकट काळात मच्छिमारांना थेट आर्थिक मदत देण्याचं सूतोवाच राणे यांनी केलं आहे. त्यामुळे मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मासेमारी जेव्हा नसते त्या कालावधीत आम्ही काय करु शकतो? या संबधी आम्ही विचार करतोय. माश्यांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद राहते. त्यामुळे मच्छिमारांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं. म्हणून त्यांना दिलासा देणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मच्छीमारांना आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 20-22 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा निर्णय लवकच जाहीर करण्यात येणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button