खेडमध्ये ६१ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या


खेड तालुक्यातील साखरोली भुघटवाडी येथे ६१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रामजी साटले (वय ६१, रा. साखरोली भुघटवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संतोष साटले यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी दारूच्या नशेत हॉलमधील लाकडी भाल्याला नायलॉनच्या जाड दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीत नमूद आहे.
घटना लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७९/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button