’जेलिफिश’ च्या तडाख्याने रापण मच्छिमार संकटात

मालवणच्या चिवला बीच समुद्र किनारी सध्या मोठ्या प्रमाणात जेलिफिश’चा वावर वाढल्याने पारंपरिक रापण मासेमारीसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. काही प्रमाणात मासळी मिळण्यास सुरुवात झाल्याने मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, समुद्रात मोठ्या संख्येने आलेल्या जेलिफिशमुळे रापण जाळ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून मासेमारी सुरू ठेवणेही धोकादायक आणि खर्चिक ठरत आहे.
रापण मासेमारी ही चिवला किनार्‍यावरील अनेक पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे प्रमुख सावन आहे. अनेक मच्छीमार एकत्रितपणे रापण समुद्रात टाकून मासेमारी करतात. गेल्या काही दिवसांत समुद्रात मासळीची काही प्रमाणात उपलब्धता जाणवू लागल्याने मच्छीमारांना दिलासा मिळाला होता. मात्र, ’जेलिफिश’च्या वाढत्या प्रमाणामुळे हा आनंद फार काळ टिकला नाही ’जेलिफिश माठक प्रमाणात जाळ्यात अडकत असल्यान मासळीऐवजी जाळ्यात जेलिफिश प्रमाण अधिक दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button