वर्दळीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या अचानक वाघाची एन्ट्री; वाहनांची चाके थांबली; दुकीस्वाराच्या जवळ वाघांनं जाऊन ठाण मांडलं अन् पुढे….

Tadoba Andhari Tiger Reserve चंद्रपूर : ऐरवी जंगलात लांब वरूनही वाघाचं दर्शन झालं तरी धडकी भरते. मात्र तोच वाघ एकदम आपल्या समोर येऊन उभा राहिला तर? असाच एक थरारक प्रसंग ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba Andhari Tiger Reserve) पद्मापूर-मोहरली रस्त्यावरील कालापाणी येथे घडला आहे. अचानक जंगलातून एक वाघ (Tiger) रस्त्यावर आला आणि त्याने दुचाकी स्वराचा रस्ता रोखून धरला . वाघ अचानक अमोरासमोर आल्याने रस्तावरुन जाणाऱ्या इतरांची ही एकच धावपळ उडाली. या थरकाप उडवणाऱ्या घटने प्रसंगी दुचाकी स्वार भीती पोटी जागाच हालू शकला नाही. तर अखेर वाघानं दुचाकीस्वाराला वाट मोकळी करत जंगलात धूम ठोकली आणि दुचाकीस्वाराने सुटकेचा श्वास सोडला.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पद्मापूर येथून एक बाईकवर मोहरलीकडे जात असताना अचानक जंगलातून एक वाघ रस्त्यावर आला, वाघ अतिशय जवळ आल्याने बाईकस्वाराने गाडी त्याच ठिकाणी थांबवली, धक्कादायक बाब म्हणजे वाघ त्या बाईक स्वाराच्या जवळ येऊन अवघ्या काही फुटांवर रस्त्याच्या बाजूला येऊन बसला, वाघ त्या बाईक स्वाराकडे रोखून बघत असल्यामुळे त्याला हलणं देखील शक्य नव्हतं, जवळपास दोन ते तीन मिनिट हा थरारक प्रसंग सुरू होता आणि समोरून येणाऱ्या एका बसमधील प्रवाशांनी हे सगळं चित्र आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं, थोड्या वेळानंतर वाघ उठून जंगलाच्या आत गेला आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला, या प्रकरणात बाईकस्वार कोण आहे आणि चूक नेमकी कोणाची याबाबत सध्या वन विभागाकडून माहिती मिळू शकलेले नाही. मात्र या घटनेनं उपस्थितांमध्ये प्रचंड दहशत आणि भीती पसरली होती.

Gondia News : वाघाची शिकार करणाऱ्या आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; विद्युतप्रवाहित करुन केली होती वाघाची शिकार

वनपरिक्षेत्र कार्यालय गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय, कोसमतोंडी, सडक अर्जुनी मधील थाटेझरी ह्या गावाजवळ लगत असलेल्या परिसरात सामुहिक गस्त करीत असताना एका नर वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाह लावून झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी वन विभागाने आठ आरोपींना अटक केली होती. सर्व आरोपींना सडक अर्जुनी न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींमध्ये रवी काशीवार (वय ४१), ढेकल पधरे (वय ६०), ओमप्रकाश पुसाम (वय ५०), रमेश कोडापे (वय ५९), महेंद्र कोडापे (वय ३२), मोहन कोडापे (वय ६१), उमेश पधरे (वय ३३), विनोद सराटे (वय ४४) सर्व रा. बोलूंदा ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button