
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत शनिवारी व रविवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, दि. २० ): राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे शनिवार दि २१ व रविवार दि २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ चे प्रमुख कार्यक्रम:
सकाळी ११ वाजता टिळक आळी येथील कै. राजाभाऊ लिमये यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर, दुपारी १२ ते १.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात वकील संघटना, जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस अकॅडमी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मुस्लिम विकास परिषद या संदर्भात स्वतंत्र बैठका घेतील.
- शैक्षणिक व कौशल्य विकास भेट: दुपारी २ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बी.एस.सी. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत बैठक, तर २.३० वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील जिल्हा कौशल्य विकास सेंटरला भेट.
- विकासकामांचे लोकार्पण: दुपारी ३.३० वाजता टिके, सायंकाळी ४.३० वाजता उमरे आणि ५.३० वाजता चिंद्रवली गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
- शिवसृष्टी म्युझियम उद्घाटन व धार्मिक कार्यक्रम: सायंकाळी ७ वाजता रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीमध्ये ‘किल्ल्यांच्या प्रतिकृती म्युझियम’चे उद्घाटन करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन व रात्री ९ वाजता पाथरट येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ चे प्रमुख कार्यक्रम: - विद्यार्थ्यांना AI प्रशिक्षण बैठक: सकाळी १० वाजता पाली कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण देण्याबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजताचा वेळ नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव.
दुपारी १ वाजता ते मोटारीने कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) कडे रवाना




