छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेला उजाळा; शिवसृष्टीत किल्ल्यांच्या प्रतिकृती संग्रहालयाचं उद्घाटन

युनेस्कोने (UNESCO) २०२५ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेल्या संग्रहालयाचं उद्घाटन आज शिवसृष्टी इथं राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे यांच्यासह नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आज साकार झाला. पालकमंत्री म्हणून जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून या संग्रहालयासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून साकारलेले हे संग्रहालय शिवरायांचा इतिहास, दुर्गस्थापत्य आणि स्वराज्याचा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

या संग्रहालयात महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा प्रेरणादायी इतिहास आणि गडकिल्ल्यांचे वैभव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार आहे, असेही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button