
रत्नागिरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीच्या प्रथम पूजेचा मान गवाणकर दाम्पत्याला

रत्नागिरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी उत्सवानिमित्त प्रथम पूजेचा मान प्रसाद उर्फ बापू गवाणकर आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रिया गवाणकर यांना मिळाला.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी पार पडले. यावेळी प्रथम पूजेचा मान मिळाल्याने गवाणकर दाम्पत्याने श्रद्धापूर्वक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.
रत्नागिरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून विशेष ओळख असून, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येथे भाविकांची मोठी श्रद्धा आणि भक्तिभाव पाहायला मिळतो. एकदाशीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.




