शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये सामंजस्य करार

रत्नागिरी :
टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील तांत्रिक कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी आणि ‘एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन’ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला.
शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे आणि एकता असोसिएशनचे अध्यक्ष. फैय्याज खतीब यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे वर्गातील तांत्रिक शिक्षण आणि गॅरेजमधील प्रत्यक्ष अनुभव यांची प्रभावी सांगड घातली जाणार आहे. याद्वारे मेकॅनिक बांधव व विद्यार्थ्यांना आधुनिक वाहन प्रणाली, व्हीकल डायग्नोस्टिक्स आणि नवीन तांत्रिक पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार असून, जिल्ह्यातील टू व्हिलर मेकॅनिक व्यवसायाला अधिक कौशल्याधारित व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होण्यास मदत होईल.
या प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे शैक्षणिक समन्वयक श्री. दि. सुतवणे सर, अधिव्याख्याता, कार्यशाळा निदेशक, तसेच एकता असोसिएशनचे सचिव श्री. धनंजय कदम, सहसचिव श्री. प्रदीप रेवाळे, महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशनचे संपर्कप्रमुख श्री. गणेश शेंडे यांच्यासह दोन्ही संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

तसेच एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे सचिव श्री. धनंजय कदम, सहसचिव श्री. प्रदीप रेवाळे, महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशनचे संपर्कप्रमुख श्री. गणेश शेंडे, श्री. दिलीप शिंदे, श्री. मयुरेश यादव, पावस विभागाचे अध्यक्ष श्री. महेश पालकर, ज्येष्ठ मेकॅनिक श्री. प्रमोद (बावा) शिवलकर, श्री. जितेंद्र भूते यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button