
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का वाढ केली
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का वाढ केली आहे. साडेतीन वर्षांमध्ये प्रथमच अशी वाढ करण्यात आली आहे. यामुळे कर्ज आणि ठेवी यांच्यावरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असून कर्जधारकांचा मासिक कर्जफेड हप्ता वाढणार आहे. तसेच, ठेवींवरील व्याजदर वाढू शकतात, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली.
या वाढीमुळे आता रेपो दर ५.५० टक्के इतका झाला आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले. फेब्रुवारी २०२३ पासून प्रथमच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. रुपयाची कमजोरी, इंधन तेलाचे उच्च दर आणि वाढती महागाई यांना अनुलक्षून हा निर्णय पेण्यात आला.




