शासनाची आकडेवारी चुकीची, चौपदरीकरणात एक नव्हे ’सात लाख’ झाडे. तोडली -वृक्ष लागवड हक्क समितीचे शाहनवाज शाह


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रत्नागिरी विभागातील वृक्षतोड आणि वृक्ष लागवड दाव्यांवरून वृक्ष लागवड हक्क समितीकडून पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चौपदरीकरणात परशुराम ते तळगाव या चार टप्प्या दरम्यान महामार्गने अधिकृतरित्या १ लाख १५ हजार ६१६ झाडांची कत्तल झाल्याची आकडेवारी जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात ही संख्या तब्बल सात लाखांच्या घरात असू शकते, असा गंभीर आरोप वृक्ष लागवड हक्क समितीचे शाहनवाज शाह यांनी केला आहे.
सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने महामार्गावरील वृक्षतोड आणि लागवड यासंदर्भात आकडेवारी जाहीर केल्यानंतर समितीचे शाह यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात शाह यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महामार्गने जाहीर केलेली आकडेवारी ही केवळ शासकीय व खाजगी जमिनीतील मनाई आदेश असलेल्या आणि वनविभागाची परवानगी घेतलेल्या झाडांची आहे. तसेच ज्या खाजगी झाडांना मोबदला देण्यात आला, त्यांचीच संख्या दाखवण्यात आली आहे. मात्र शासकीय जमिनीवरील बिगर मनाई आदेशातील दहा वर्षांपासून ते २०० वर्षे जुने असाव्य वृक्ष आकडेवारीतून गायब असला त्या आरोप त्यांनी केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button