चिपळूण-कराड मार्गावरील शहरातील बहादूरशेख नाका येथे दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू


चिपळूण-कराड मार्गावरील शहरातील बहादूरशेख नाका येथे दुचाकीस्वाराने भास्कर पूंजाजी कोळी (६५, मुसाड) या वृद्धाला बडक दिल्याची घटना शनिवारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या या वृद्धाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी दुचाकी चालक मंथन मिलिंद कुंभार (१७, खेर्डी) हाही जखमी झाला आहे. याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रघुनाथ राजाराम सुर्वे (३२, मुसाड) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंथन कुंभार हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने शनिवारी खेर्डीकडे जात होता. यावेळी त्याने दुचाकी निष्काळजीपणे, बेदरकारपणे चालवून रस्ता ओलांडत असलेल्या भास्कर कोळी यांना धडक दिली. ही धाडक इतकी जोरदार होती की यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मंथन हा देखील जखमी झाला आहे. दुचाकी चालक मंथन कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button