गवाणे येथील भाजलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

लांजा : अपंगत्वामुळे आलेल्या नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलेल्या गवाणे येथील प्रभाकर शंकर रेवाळे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात २४ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

२३ ऑक्टोबर रोजी सकाळी गवाणे येथील रेवाळेवाडी येथे ही घटना घडली होती. घरात एकटे असताना त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. शेजाऱ्यांनी आग विझवून त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ते ७५ ते ८० टक्के भाजल्याने पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button