रत्नागिरी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश सावंत: नूतन कार्यकारिणी जाहीर

देवरुख : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी मंगेश सावंत, तर कार्यवाहपदी उमेश दळवी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

चिपळूण तालुक्यातील कोकरे येथील जनता माध्यमिक विद्यालयात ही सभा पार पडली. यावेळी संघटनेच्या पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२६ च्या जमाखर्चास मंजुरी देणे, गतवर्षातील कामकाजाचा आढावा घेणे आणि संघटनेची आगामी ध्येयधोरणे निश्चित करणे, या विषयांवर सभेत चर्चा झाली.

सभेच्या प्रारंभी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी, संस्थेचे संचालक कुपेश दळवी आणि मुख्याध्यापिका सुप्रिया पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांचे स्वागत केले.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष मंगेश सावंत यांचा रामचंद्र केळकर व निवडणूक निरीक्षक गजानन पाटणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेत तब्बल २८ वर्षे विविध पदांवर कार्यरत राहून योगदान देणारे तसेच गतवर्षी शिक्षकपदी पदोन्नती मिळालेले मनीष दळवी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष मंगेश सावंत, कार्याध्यक्ष महेश कदम, उपाध्यक्ष लक्ष्मण लोखंडे, मनोज लाबणे व मिलिंद काटवे, कार्यवाह उमेश दळवी, कोषाध्यक्ष अमोल पलसुलेदेसाई, अन्याय निरीक्षक नामदेव चव्हाण, महामंडळ प्रतिनिधी शंकर पाळतणकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच रामचंद्र केळकर, गजानन पाटणकर, प्रकाश सावळी, मनोहर दयाळकर, राजेश पवार, सुधाकर भोजने, संदीप पाटे, आतिरा मुल्ला व अनुजा पवार यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन पाटणकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले.

अमोल लिगायत यांच्या कार्यवाहीसह निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभेचे सूत्रसंचालन मनीष दळवी यांनी केले. यावेळी बहुसंख्य सभासद कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button